अहमदनगर रिपाइं (आठवले) पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

अहमदनगर- (६ डिसेंबर २०२२) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारण्यासाठीचे अमूल्य असे योगदान कारणीभूत आहे.मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन ध्यास होता.त्यासाठीच त्यांनी ज्ञानसाधना केली समाजात समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि लोकशाहीचे मूल्य रूजावीत यासाठी आपल्या विद्वतेचा विनियोग केला.आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्माण करून अमूल्य असे योगदान दिले आहे.यातून एक सशक्त असे प्रजासत्ताक भारत राष्ट्र उभे राहिले.या योगदानासाठी आपण सर्व कृतज्ञ राहूया आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी कटिबद्ध राहूया.असे आवाहन त्यांच्या कडुन करण्यात आले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ,नगरसेवक राहुल कांबळे,युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे,नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,बौद्धाचार्य संजय कांबळे,विलास साठे, महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके,दीपक गायकवाड,पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, नानासाहेब तुपेरे,जयराम आंग्रे, अविनाश कांबळे,रावसाहेब रंधवे, मच्छिंद्र गांगर्डे,बापू जावळे, कृपाल भिंगारदिवे,दत्तात्रय जावळे,बाळासाहेब नेटके,सिद्धांत कांबळे,योगेश त्रिभुवन,लहु घंगाळे,सिद्धांत दाभाडे,प्रदीप पवार,दीपक पाडळे,प्रमोद घोडके आदी उपस्थित होते.