अहमदनगर जिल्हा कारागृह वर्ग 2 येथे कारागृह विधी सहाय्य केंद्राचे उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, जिल्हा कारागृह, वर्ग-2, अहमदनगर बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने न्यायाधीन बंद्यासाठी कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम बुधवार, दिनांक 16 /11 /2022 रोजी अहमदनगर जिल्हा कारागृह -2 येथे संपन्न झाला. अहमदनगर जिल्हा कारागृह वर्ग-2 येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांचे साह्याने ‘कारागृह विधी सहाय्य केंद्राचे’ उद्घाटन माननीय श्री. सुधाकर यार्लगड्डा, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
माननीय श्री सुधाकर वे. यार्लगड्डा, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बंद्याना जीवनातील विविध उदाहरणे देऊन आपण आपल्या जीवनामध्ये माणूस म्हणून जगताना कशाप्रकारे बदल केले पाहिजे हे समजावून सांगितले. भारतीय घटनेने बंद्यांना दिलेले अधिकार व विधी सेवा प्राधिकरणामार्फत बद्यांना दिले जाणारे विधी सहाय्य याबाबत माहिती त्यांनी दिली. तडजोड योग्य व तडजोड अयोग्य प्रकरणांबद्दल माहिती दिली. तसेच, मा. न्यायमूर्ती श्री. अभय ओक यांनी स्वतःहून दखल घेतलेल्या याचिकेतील मुदयानुसार शिक्षेच्या संदर्भातील वाटाघाटीचे प्रयोजन (प्ली बार्गेनिंगबाबत) सविस्तर माहिती माननीय श्री. सुधाकर यार्लगड्डा, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांनी दिली विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यक्रमांना व उपक्रमांना पॅनल विधीज्ञ व वकील संघाचे विधीज्ञ वेळ खर्च करून देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांची भरभरून प्रशंसा त्यांनी केली.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती भाग्यश्री का. पाटील, सचिव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,अहमदनगर यांनी केली. त्यांनी उपस्थित बद्यांना इथून बाहेर पडल्यानंतर आपल्या जीवनामध्ये केलेल्या चुकांची दुरुस्ती करून माणूस म्हणून कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत बद्यांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
Adv. भुषण ब-हाटे, adv. श्रीमती स्वाती नगरकर यांनी कैद्यांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. यांनी उपस्थित बंद्याला जामीनाच्या तरतुदीवर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन adv. श्री अक्षय कराळे यांनी केले व आभार प्रदर्शन adv.पल्लवी भूमकर- सुपेकर यांनी केले. सदर कार्यक्रमास adv. सागर पादिर adv. राजाभाऊ शिर्के, adv. अनुराधा येवले,adv सुनील तोडकर adv. बेबी बोर्ड, adv. सारिका खाकाळ व इतर विधीज्ञ उपस्थित होते. कारागृह अधीक्षक श्री ज्ञानेश्वर काळे यांनी सर्वांचे आभार मानले सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा कारागृहाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.