पत्रकारांचा तोतया पत्रकार संभावना करणाऱ्या विजय जाधव या शिक्षकाचा जामखेड तालुका पत्रकारांकडून जाहीर निषेध, गुन्हा नोंद करण्याची मागणी !

जामखेड दि. 29 एप्रिल (प्रतिनिधी )= विजय जाधव उपशिक्षक जिव्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा ता. जामखेड तालुक्यातील शिक्षकाने पत्रकाराला तोतया पत्रकार म्हणून हिनवून अपमानीत केल्यामुळे सर्व पत्रकार बांधवांचा अवमान झाला आहे . त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जामखेड तालूका पत्रकार संघाने केली असून त्याच्या वक्तव्य चा जाहीर निषेध करून तसे ‘ निवेदन मा. तहसिलदार , मा. पोलिस निरीक्षक यांना पत्रकारांनी दिले आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , श्री . सुजित सुभाष धनवे हे चित्रा न्युज डिजिटल मिडीया पोर्टलला काम करतात . गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मोहा शाळेला भेट दिली होती त्यावेळी विजय जाधव हे शिक्षक शालेय कामी गैरहजर होते. त्याची बातमी चालविलेली होती. याचा राग मनात धरून जाधव यांनी सुजित धनवे यांना तोतया पत्रकार म्हणाले त्यामुळे त्यांचा अवमान झाला आहे.
या निवेदनावर सुजित धनवे, अजय अवचरे, नंदुसिग परदेशी, सुदाम वराट , पप्पू सय्यद, अविनाश बोधले, संजय वारभोग, किरण रेडे , अशोक वीर, दत्तराज पवार आदि. पत्रकारांच्या सहया आहेत .