राजकिय

महिला सबलीकणासाठी देशात मोदीपर्वाची गरज,.म्हणून सुजय विखे यांचा विजय आवश्यक आहे : प्रियाताई जानवे

नगर दि. 25 एप्रिल (प्रतिनिधी) : 
 देशात महिला सबलीकरणासाठी मोदीपर्वाची गरज असून त्यासाठी नगर मधून डॉ. सुजय विखे यांना विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा प्रियाताई जानवे यांनी केले. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या पर्वात महिलांच्या विकासासाठी सर्वाधिक योजना आणल्या. याच योजना जिल्ह्यात तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मागील पाच वर्षात खासदार सुजय विखे यांनी केले. यामुळे देशात मोदींजी आणि जिल्ह्यात डॉ. सुजय विखे पाटील हेच योग्य नेतृत्व करू शकतील असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रियाताई जानवे यांनी यावेळी विरोधी उमेदवाराचा चांगला समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, आमदार असताना विरोधी उमेदवाराने महिलांना कशा प्रकारे त्रास दिला हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मोठ्या पदावर असतानाही त्या महिलांचे खच्चीकरण करून त्यांना आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला. यांची आपल्या सर्वांना माहिती आहे. जर अशी व्यक्ती सत्तेत आली तर महिलांना रस्त्यावरून फिरणे अशक्य होणार आहे.यामुळे अशा विचारसरणीचा माणुस राजकारणात नाही तर समाजात असणे गरजेचे नाही यामुळे अशा वृत्तींना मतदारांनी हाणून पाडले पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
तर दुसरीकडे डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना पीठ गिरणी, शेती अवजारे, पॅकिंग मशीन आदी वस्तूंच्या माध्यामातून स्वयंरोजगार देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रधानमंत्री मातृयोजनेच्या मार्फत दीड लाखाहून अधिक महिलांचे मातृत्व सुरक्षित आणि सुखद केले. तर उज्वला योजनेच्या माध्यमातून तीन लाखाहुन अधिक महिलांचे आरोग्य सुरक्षित केले. अशा विविध योजनाच्या माध्यमातून डॉ. सुजय विखे हे सच्चा भाऊ म्हणून महिलांच्या मागे उभे राहिले आहेत. यामुळे आपल्या पाठीराख्याला विजयी करणे हे नगर जिल्ह्यातील प्रत्येक महिलेचे आद्य कर्तव्य राहणार आहे. येत्या १३ मे रोजी डॉ. सुजय विखे मोठ्या मदाधिक्याने मतदान करा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम मध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी केले. 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे