रेल्वेस्टेशन येथील मनपाच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी प्रयत्नशील – मयूर (बाली) बांगरे.

अहमदनगर दि.२० जून (प्रतिनिधी)- बाली बांगरे मित्र मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील अहमदनगर महानगरपालिकेच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अमोल रणदिवे व कुमार ढाके यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मयुर (बाली) बांगरे, दीपक लोंढे संभाजी पवार, भगवान खैरे, गणेश पेटारे, अन्सार शेख, सरपंच ज्ञानेश्वर कवडे, बंटी जाधव, आनंद सरोदे, सोफियान मन्यार, सचिन सप्रे, शरद दळवी, सोमा रोकडे, मुख्याध्यापक विजय घिगे, मनीषा शिंदे, भारती कवडे, वर्षा लोंढे, मनीषा गिरमकर, विठ्ठल आठरे, अनिल बडे आदी उपस्थित होते. मयुर (बाली) बांगरे म्हणाले की गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाळेबंदीनंतर सर्वसामान्य घटकांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने कार्य करणार असल्याचे सांगितले व संभाजी पवार यांनी विद्यार्थ्यांना हलाखीची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसून, उच्च शिक्षित होऊन आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.