मिरजगांव मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

मिरजगाव दि.३१ मे (प्रतिनिधी)
भारत देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती थाटामाटात साजरी केली जाते. कर्जत तालुक्यातील मिरजगाव मध्ये देखील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती अगदी उत्साहात साजरी केली गेली. पूर्ण मिरजगाव मध्ये पारंपारिक वाद्य वाजून फटाक्यांची आतिश बाजी करत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. व मिरजगाव मधील धनगर गल्ली या चौकाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक हे नामकरण करण्यात आले. व मिरजगाव मधील क्रांती चौक या ठिकाणी भव्य अशी सजावट करून. सीआयडी पोलीस निरीक्षक पूजा बाळासाहेब लगस व मिरजगावच्या विद्यमान सरपंच सौ. सुनिता नितीन खेतमाळ यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती मिरजगाव चे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.