राजकीय जीवनात वाटचाल करत असताना दुर्बल व वंचित घटकाची नेहमी मदत करावी :सुरेशभाऊ बनसोडे
सामाजिक कार्यातून आ.अरुणकाका जगताप यांचा वाढदिवस साजरा

अहमदनगर दि.२५ (प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार.आदरणीय.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पंचशील विद्यामंदिर सिद्धार्थनगर अहमदनगर येथील विध्यार्थ्यांना शाळेय क्रीडासाहित्याचे वाटप उद्योजक.मा.मयुर भाऊ कुलथे व खाऊचे वाटप उद्योजक मा.अभय शेठ श्रीश्रीमाळ यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मा.सुरेश भाऊ बनसोडे हे बोलत होते..
राजकीय जीवनात वाटचाल करत असताना दुर्बल व वंचित घटकाची नेहमी मदत करावी व सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असावे अशी काकांची शिकवण आम्हाला नेहमी प्रेरणा देत असते अन त्याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचा योग आला,अन येणाऱ्या काळातही अश्याच पद्धतीचे कार्यक्रम राबवले जातील अशी ग्वाही मा.सुरेशभाऊ बनसोडे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी उधोजक.मयुर शेठ कुलथे,उधोजक.अभय शेठ श्रीश्रीमाळ,संस्थेचे अध्यक्ष सुमेधभाऊ गायकवाड,सामाजिक न्याय विभागाचे संघटक .अंकुशभाऊ मोहिते,भिंगार शहर प्रमुख मा.सिद्धार्थ आढाव ,उधोजक ,दीपक शेठ परदेशी,.दीपक भाऊ सरोदे प्राध्यापकवृंद,विद्यार्थीवर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.