नगर जामखेड रस्त्यावरील निंबोडी ते आठवड गावापर्यंत मोठ्या प्रमाणात झालेले खड्डे बुजवण्याची जनआधार सामाजिक संघटनेची मागणी राष्ट्रीय महा मार्गाच्या अधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन वर्षांपूर्वी सुमारे 21 कोटी रुपये खर्च करून NHAI अहमदनगर यांच्या देखरेखीखाली या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याची आजची अवस्था पाहता रस्त्याचे काम हे तांत्रिकदृष्ट्या उत्तम केलेले आहे. परंतु मागील पावसाळ्यात अधिकचा पाऊस झाल्याने संबंधित रस्त्याला जामखेड नाका – निंबोडी ते चिचोंडी पाटील ते आठवड पर्यंत अनेक खड्डे पडलेले आहेत.सदरचे खड्डे हे मोठ्या आकाराचे असल्यामुळे दुचाकी वाहनांचे चाक त्यात फसून अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे,सदरील बराचसा रस्ता अत्यंत चांगला असल्याने रस्त्यावर अचानक समोर खड्डा आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून या खड्ड्यांमुळे चार ते पाच लोकांनी मागील महिन्यात आपला प्राण गमावलेला आहे तसेच झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा गवत आणि वेली याचे प्रमाण वाढल्याने रात्रीच्या वेळी रस्ता पूर्णपणे दिसत नसल्याने देखील अपघात होत आहे त्यामुळे सदरील रस्त्यावरील खड्ड्यासह दुतर्फा असलेली साईड पट्टी दुरुस्त करून घेण्याच्या मागणीसाठी रेल्वे स्टेशन येथील नॅशनल हायवे चे ( NHAI) कनिष्ठ अभियंता रावसाहेब धांडोरे यांना निवेदन देताना जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत दीपक गुगळे, आप्पासाहेब केदारे, अमित गांधी, विजय मिसाळ, गौतमीताई भिंगारदिवे आदी उपस्थित होते