राजकिय

भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल शिंदे तर सरचिटणीसपदी सुनील महाजन यांची नियुक्ती

अहमदनगर दि. 11 फेब्रुवारी (प्रतिनिधी) राज्यातील सांस्कृतिक कला, जोपसण्यासाठी व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कलावंतांचा मानसन्मान व्हावा व त्यांच्या अडी अडचणी, समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ भालसिंग यांनी भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण विभाग कार्यालयात सन्मान पुर्वक दैनिक राज आनंदचे मुख्य संपादक, जेष्ठ पत्रकार, अभिनेते, विठ्ठल शिंदे यांची सांस्कृतिक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचे पत्र दिले आहे तसेच ज्येष्ठ कलावंत, गीतकार, संगीतकार, मुक्त पत्रकार,लेखक ,निवेदक,गायक, वादक सुनीलजी महाजन यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याचे पत्र यावेळी देण्यात आले आहे, जिल्ह्यातील कलाक्षेत्रातील सर्वच उपेक्षित तसेच गुणवंत कलावंतांचा मानसन्मान वाढवून त्यांच्या शासन दरबारी समस्या सोडवण्यासाठी ,या सांस्कृतिक आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे, शिंदे आणि महाजन यांनी गेले 40 वर्ष सातत्यने केलेले या क्षेत्रातील योगदान यांची दखल घेऊन,या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, लवकरच जिल्हा कार्यकारी, तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहेत, तसेच या सांस्कृतिक आघाडीच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय कार्यक्रम अनेक नवउपक्रम राबवले जाणार असल्या ची माहिती यावेळी देण्यात आली आहे ,या दोघांच्या निवडी बद्दल पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री, शिवाजी कर्डिले,माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार मोनिका ताई राजळे,प्रा.भानुदास बेरड, अरुण मुंडे, बाबासाहेब वाकळे आदी मान्यवर व्यक्तींनी अभिनंदन केले आहे. याप्रसंगी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव सुपेकर, युवक नेते बाबु दादा पठारे, युवा नेते योगेश कासार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश भालसिंग ,कार्यालयीन प्रमुख विशाल साठे, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेलार आदींची प्रमुख उपस्थिती होती.या बाबद प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे