केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी19 नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर!

अहमदनगर दि. 16 नोव्हेंबर (प्रतिनिधी):-केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार दि. 19 नोव्हेंबर, 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता औरंगाबाद विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अहमदनगरकडे प्रयाण करतील. दुपारी 2-30 वाजता बुऱ्हाणनगर हेलिपॅड ता. अहमदनगर येथे आगमन. दुपारी 2.35 वाजता बुऱ्हाणनगर हेलिपॅड ता. नगर येथून मोटारीने शिवाजीराव कर्डीले यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 2.45 शिवाजीराव कर्डीले यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. स्थळ:- शिवाजीराव कर्डीले मळा, बुऱ्हाणनगर ता.जि. अहमदनगर. दुपारी 3-00 वाजता शिवाजीराव कर्डीले यांच्या निवासस्थान येथून भैय्या गंधे यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता भैय्या गंधे यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. स्थळ:- प्रोफेसर कॉलनी सावेडी, अहमदनगर. दुपारी 3.30 वाजता भैय्या गंधे यांच्या निवासस्थान येथून मोटारीने अहमदनगर शहर उड्डाणपुल उदघाटन कार्यक्रमाकडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता अहमदनगर उड्डाणपुलाच्या एन.एच.ए.आय. कामाच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती. स्थळ:- शिल्पा गार्डन, अहमदनगर. सायं. 4.45 वाजता शिल्पा गार्डन अहमदनगर येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅडकडे प्रयाण. सायं. 4.50 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, अहमदनगर येथे आगमन. सायं. 5.00 वाजता अहमदनगर येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण करतील.