पुरंदर दि. 24 जानेवारी (प्रतिनिधी ) आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बॅरिस्टर डॉ. जयकर व्याख्यान माला नुकतीच संम्पन्न झाली.
16 ,17 व 19 जानेवारी 2024 या तीन दिवसीय व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बालाजी नाटकरे उपस्थित होते. भविष्याल केंद्राचे कार्यवाहक प्रा. कल्पना रोकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाची भूमिका विशद केली.
याप्रसंगी पहिल्या व्याख्यानाचे पुष्प श्री मकरंद मधुकर टिल्लू यांनी “गोष्ट शंभर कोटीची पाण्याच्या मैत्रीची “या विषयावर व्याख्यान दिले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत विनोदी भूमिकेतून पाण्याचे नियोजन व ते कसे वापरावे याविषयी मार्गदर्शन केले. तोटी नसलेल्या नळाला तोटी बसविण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला. विद्यार्थ्यांनी या पाणी वाचवा अभियानात सहभाग वाढवावा याविषयी त्यांनी प्रोत्साहित केले. ‘ज्याच्या मध्ये एनर्जी आहे त्याच्याभोवती जग फिरते’ आयुष्याचा पहिला नियम ऊर्जा आहे असेही त्यांनी सांगितले ‘यशस्वीतेसाठी आयुष्यात उत्सुकता ठेवा नव्याने आनंद जगणे म्हणजे यशाचे गमक आहे ‘असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा.कल्पना रोकडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. संगीता पवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी 17 जानेवारी 2024विशाल शिक्षणाचे डॉ .बाबासाहेब व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प प्रा मुबीन शब्बीर तांबोळी यांनी “जगण्याचा पासवर्ड आणि हास्यहंडी “या विषयावर दिले त्यांच्या व्याख्यानातूनअनेक हास्याचे फवारे निर्माण केलेत्यांच्या अभिनयाने व विनोदाने विद्यार्थ्यांची मने जिंकली जीवनात माणसाने जगावे कसे याबद्दल विद्यार्थ्यांना मोकळीक मार्गदर्शन केलेकापूर लाकूड आणि चिखल अशा तीन व्यक्तिमत्त्वातून विद्यार्थी कसे घडतात याविषयी त्यांनीआपले अनुभवातून व्यक्त केले ‘जिंदगी मे कोई अगर पाना चाहता है तो जिंदगी का व्हाय क्लियर करो ‘असे ते म्हणाले
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाचे संयोजन व व्याख्यात्यांचा परिचय प्रा. कल्पना रोकडे यांनी केले तर आभार प्रा. संगीता पवार यांनी मानले
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ‘शिक्षकेतर कर्मचारी
व विद्यार्थी उपस्थित होते.
भविष्याल कार्यक्रमातील डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे तिसरे व शेवटचे पुष्प 19 जानेवारी 2024 रोजी विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य व विज्ञान बारामती कॉलेजचे प्रा. राजकुमार कदम सरांनी “स्वप्ने युवा पिढींची “या विषयावर दिले यावेळी ते म्हणाले विद्यार्थ्यांनी योग्य वेळेत व योग्य वयात आपली ध्येय ठरवावीत देशातील अनेक महापुरुष ,महानायक, क्रांतिकारी व संतांची चरित्रे वाचावीत व तसेच स्वतःला घडवाअसे ते म्हणाले
अतिशय नाजूक परिस्थिती स्वतःला घडवणाऱ्या माणसांची यशोगाथा त्यांनी सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित व प्रोत्साहित केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .बालाजी नाटकरे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक शिक्षकेतर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा