दिलीप सातपुते शिवसेनेला लाभलेलं सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य नेतृत्व – रावसाहेब भाकरे महाराज

केडगाव (प्रतिनिधी) – शिवसेनेशी प्रत्येक सर्वसामान्यांची नाव जोडले गेले आहे. प्रत्येक शिवसैनिकांसाठी शिवसेना एक कुटुंब आहे. जो कोणी शिवसेनेशी जोडला गेला, त्याच्या हृदयातून शिवसेनेला कोणी काढू शकत नाही. शिवसेनेने अनेक शिवसैनिक घडविले. शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे जो सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. शिवसेना हे सर्वसामान्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे. प्रत्येक सर्वसामान्यांना शिवसेनेने संधी दिली आहे. दिलीप सातपुते हे सर्वसामान्य कुटुंबातील असचं केडगाव शिवसेनेला लाभलेलं असामान्य नेतृत्व असल्याचे प्रतिपादन कट्टर शिवसैनिक हभप रावसाहेब भाकरेमहाराज यांनी केले.
शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास इंजिनिअर प्रशांत भाकरे, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर, विठ्ठल सातपुते, भरत कांडेकर, बालघर प्रकल्पाचे अध्यक्ष युवराज गुंड, शंभूराजे युवा प्रतिष्ठानचे वल्लभ कुसकर, अभिजीत कोतकर, विठ्ठलमहाराज कोतकर, संदीप गागरे, दीपक बारस्कर, ओंकार सातपुते, अनिकेत शिर्के, विशाल शिरवळे, ऋषभ शिंदे व विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. भाकरे पुढे म्हणाले की, माजी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते केडगाव शिवसेनेला लाभलेला ढाण्या वाघ आहे. त्यांनी शिवसेना जोमाने वाढवली. ते नेहमी केडगाव शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या सुख-दुःखात धावून जातात. अन्यायाला वाचा फोडून सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी तयार असतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलमहाराज कोतकर यांनी केले, तर आभार इंजिनिअर प्रशांत भाकरे यांनी मानले.