ब्रेकिंग
आमदार अरुण काका जगताप यांनी केला आरपीआय नेते अजय साळवे यांचा वाढदिवस साजरा

अहमदनगर दि.२० (प्रतिनिधी) फुले,शाहू,आंबेडकरी चळववळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आरपीआय (आठवले) गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव माजी नगरसेवक अजय साळवे यांचा वाढदिवस नुकताच विधान परिषदेचे सदस्य आमदार अरुण काका जगताप यांनी त्यांच्या आयुर्वेद येथील कार्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी साळवे यांचा फेटा बांधून,शाल, पुष्गुच्छ देऊन पेढे वाटत सत्कार करण्यात आला.यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी प्रा.जयंत गायकवाड,नितीन कसबेकर,पत्रकार महेश भोसले,त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.