पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी) : पोलिस बोईज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन खंडागळे व सर्व सभासद यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन खंडागळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही क्षेत्रात त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व यामधून प्रेरणा घेत ते विचार कृतीत आणले तर एक सुंदर समाज निर्माण होऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
यावेळी पोलिस बोईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर, खजिनदार संकेत पवार, सचिव सिद्धांत ससाणे, मार्गदर्शक प्रा.विनायक लष्कर
नंदू साबळे.संतोष तुपे.वसिम शेख. शैबाज शेख.नागेश शिरसाठ.संजय जाधव.प्रकाश येणारे, संतोष सासवडे, नितीन जाधव,पुनम आरणे,नितीन अकोलकर, सुनिल जंबे,सुरेश फसले, किरण भापकर,किरण शिंदे, गणेश लष्कर,सतीश मुंडलिक, व सर्व सदस्य उपस्थित होते.