कौतुकास्पद
पोहेकॉ.राजेंद्र सुद्रिक यांची ३७ व्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत वर्णी महाराष्ट्र संघात निवड

-
अहमदनगर (दि.२५ डिसेंबर):-नुकतीच ३७ वी राज्यस्तरीय शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा पुणे येथील दिघी येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता.या चाचणीत अहमदनगर जिल्ह्यातून संघाचे नेतृत्व करणारे पोहेकॉ/राजेंद्र आप्पासाहेब सुद्रिक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे अहमदनगर जिल्हा पोलीस दलातून अभिनंदन होत आहे.