धार्मिक

विद्याविहार सोसायटी मध्ये श्री दत्त जन्मोत्सवाची महाप्रसादाने सांगता

अहमदनगर-
विद्याविहार सोसायटी येथे दरवर्षी प्रमाणे राजेंद्र येंडे परिवाराने दत्त जन्मोत्सवाचे आयोजन केले होते.
विशाल येंडे, रोहित जंगम आणि प्राजक्ता जंगम यांनी श्री गुरुचरित्र पारायणाने उत्सवाचा प्रारंभ केला. मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी विशाल आणि दिक्षा येंडे तसेच रोहित आणि प्राजक्ता जंगम या यजमानांच्या हस्ते श्री दत्त याग महापुजा आयोजित करण्यात आली. दुपारी 12 वाजता भक्तिमय वातावरणात श्री दत्त जन्मोत्सव महाआरती करुन साजरा करण्यात आला.या वेळी महिलांनी पाळणा आणि भजन गायल्याने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. बुधवार दिनांक 27 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, या वेळी ओम शिव चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान भिंगार चे विजय महाराज चव्हाण, नाथयोगी परिवार नालेगाव चे भरत महाराज शेळके ( मस्तनाथ ),गोरक्षनाथ सेवेकरी राजु मामा रासकर , कानिफनाथ सेवेकरी गोरख तात्या थोरात ,पालनहार दरबार चे कानिफनाथ भाऊ कानगुडे यांच्या हस्ते महाआरती करुन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आमदार संग्राम भैया जगताप, महापौर रोहिनी ताई शेंडगे,सभापती गणेश कवडे, संजय शेंडगे,माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक आप्पा नळकांडे,भाऊ बोरुडे, बाळासाहेब बोराटे,सचिन शिंदे ,संतोष गेनाप्पा,विधाते सर ,संजय झिंजे ,महेश सुरसे,गणेश वाघ ,ॲड.भगवान कुंभकर्ण, ॲड. अनुराधा ताई येवले , बालकल्यान समिती सदस्य , संपुर्णा ताई सावंत, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष,तसेच सामाजिक कार्यकर्त्या सविता ताई मोरे यांच्यासह नवामराठा चे संपादक सुभाष गुंदेचा,जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, अशोक झोटिंग, विविध वृत्तपत्रातील ,इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील पत्रकार, प्रेस फोटोग्राफर, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रिडा ,सामाजिक आणि धार्मिक ,तसेच व्यापारी क्षेत्रातील मान्यवर आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत येंडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र व चित्रा येंडे, विशाल आणि दिक्षा येंडे याच्या सह शैलेश कुलकर्णी, असिम भोपे, रोहित देशपांडे, तेजस शेटे,आनंद काठेड, आदित्य मोहळकर, अमोल बिमन, दिनेश सरोदे,आदित्य चव्हाण यासह विशाल येंडे मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे