गुन्हेगारी
शहरातील युवा सराफ व्यावसायिक अडकला हनी ट्रॅपमध्ये महिलेकडून 10 लाखाची मागणी; कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल



या फिर्यादीवरुन सदर महिला, तिचे दोन महिला नातेवाईक व योगेश उर्फ सोनू पोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर त्या महिलेने तुझा किरीट सोमय्या सारखा व्हिडिओ असल्याचे सांगून बदनामी करण्याची धमकी दिली. त्या महिलेने वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी घाबरुन त्या महिलेने बोलावलेल्या पाईपलाईन रोडवरील कॅफेवर गेला. तिथे सदर महिला तिचे नातेवाईक असलेल्या दोन मैत्रिणी समोर मुलीच्या नावावर प्रत्येकी 5 लाख रुपये टाक, नाहीतर माझ्याशी लग्न कर, नाहीतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी त्या महिलेने दिली. यावेळी योगेश उर्फ सोनू पोटे याने देखील तेथे येऊन महिलेला पैसे देण्यास फिर्यादीला धमकावले. तेथून निघून गेल्यानंतर 16 डिसेंबर रोजी फिर्यादीच्या सराफ दुकानात महिलेने येऊन त्याचे वडिल व कामगार यांच्या समोर पैश्याची मागणी केली. 18 डिसेंबर रोजी पुन्हा दुकानात येऊन सदर महिलेने धमकी दिल्याचे बोऱ्हाडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.