आयुक्त साहेब कोणाचा जीव जाण्याअगोदर तपोवनरोड चा बाजार हटवा -सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा
तपोवनरोड वरील भाजी बाजार नागरिकांपेक्षा विक्रेत्यांना धोकादायक

नगर दि.4 डिसेंबर (प्रतिनिधी )- सावेडी उपनगरातील दुसरे मोठे मार्केट तपोवन रोड वर अस्तित्वात आले असून या भागातील तपोवन रोडवरील भाजी मार्केट हटवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त,अहमदनगर महानगरपालिका यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
तपोवन रोड वरील भाजी मार्केट हे रस्त्यावरच मांडत असल्यामुळे भाजी खरेदी करणाऱ्यापेक्षा भाजी विक्रेतेच्या जीवितास धोका निर्माण झालेला असून हा रस्ता मनमाड रोड ते औरंगाबाद रोड असा जोडणारा उपनगरातील मोठा रस्ता असून या रस्त्यावर मोठया प्रमाणात जड वाहतूक ही होत असते या गाड्यांचा वेग जास्त असतो या मुळे एखाद्या नागरिकांची अथवा भाजी विक्रेतेची जीव जाण्या अगोदर मा. आयुक्त यांनी हा भाजी बाजार हटवून त्यांना पर्यायी जागा म्हणून याच परिसरातील एखादे मैदान उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.
या भाजी विक्रेते कडून पालिका महसूल जमा करीत असते असे निदर्शनास आले आहे परंतु या पेक्षाही नागरिकांचा जीव महत्वाचा आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधी बरोबर या भाजी बाजाराबाबत चर्चा केली असता त्यांनी ही या गोष्टीस दुजारा दिला हे मार्केट हलवायलाच पाहिजे, परंतु मोठया राजकारणी व्यक्तीमुळे प्रशासन दबावाला बळी पडून कोणतीही कारवाई करत नाही असे त्यांनी सांगितले . या साठी प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता नागरिकांच्या जीवितेची काळ्जी घेऊन व भाजी विक्रेते यांचा विचार करून त्यांच्या वर अन्याय होणार नाही अश्या पद्धतीने योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.