युवा ग्रामीण पत्रकार संघाची राहुरी तालुका कार्यकारीणी जाहीर, अध्यक्षपदी अशोक मंडलिक उपाध्यक्ष पवार, सचिव जाधव, तर जिल्हा निमंत्रकपदी राजेंद्र म्हसे

राहुरी / प्रतिनिधी – राज्याच्या युवा ग्रामीण पत्रकार संघाची अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली त्यात राहुरी तालुकाध्यक्षपदी अशोक मंडलिक जिल्हा निमंत्रकपदी राजेंद्र म्हसे, सचिवपदी रमेश जाधव तर उपाध्यक्षपदी राजेंद्र पवार यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी राहुरीत युवा ग्रामीण पत्रकार संघाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार नाशिक विभाग प्रमुख शरद तांबे, जिल्हाध्यक्ष महेश भोसले, मुख्य सल्लागार प्रभंजन कनिंगध्वज यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
ग्रामीण पत्रकारांच्या विविध प्रश्नांप्रती चर्चा या बैठकीत करण्यात येत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांप्रती एकनिष्ठ राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याकामी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला
प्रसंगी जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले यांनी तालुका कार्यकारीणी जाहीर केली त्यात राहुरी तालुका अध्यक्षपदी अशोक मंडलिक जिल्हा निमंत्रकपदी राजेंद्र म्हसे, सचिव पदी रमेश जाधव, उपाध्यक्षपदी राजेंद्र पवार, खजिनदार पदी मनोज साळवे, सहसचिव दिपक दातीर, सहसचिवपदी कमलेश विधाटे, सहसंघटकपदी दीपक मकासरे, संघटक जावेद शेख, प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण पठारे, समीर शेख तर सदस्यपदी मधुकर म्हसे, रमेश खेमनर, सुभाष कोंडेकर, वसंत भोसले, सुरेश तरकसे, देवराज मनतोडे यांच्या निवडी जाहीर करण्यात आले आहे.
प्रसंगी तालुक्यातील विविध मान्यवरांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांचा शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.