प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया – न्यायाधीश सत्यवान डोके बाळासाहेब धनवे शिक्षण विभागातील सिंघम

जामखेड दि. 17 नोव्हेंबर (प्रतिनिधी ):- बाळासाहेब धनवे यांनी जामखेडचा गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून कामचुकार शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलला काम करणाऱ्या शिक्षकांवर कौतुकाची थाप दिली यामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढीस लागली आहे. प्राथमिक शिक्षण हाच खरा जीवनाचा पाया आहे असे मत बीड जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके यांनी सांगितले.
जामखेड पंचायत समिती शिक्षण विभागात न्यायाधीश डोके साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या बरोबरच्या जुन्या मैत्रीला उजाळा दिला यावेळी पत्रकार नासीर पठाण, सुदाम वराट, मोहिद्दीन तांबोळी, अविनाश बोधले, सुजीत धनवे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश डोके यांचा गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी सन्मान केला यावेळी बोलताना न्यायाधीश डोके म्हणाले की, गटशिक्षणाधिकारी व माझी मैत्री मी वकील व ते गुरूजी असतानाची आहे. आम्ही दोघांनी पत्रकारिता छंद जोपासला होता. आम्ही दोघेही कष्टातून शिकलो.
आम्ही दोघे जिल्हा परिषद शाळेत घडलो आमचा पाया मजबूत झाला आहे याचा फायदा आजही होत आहे. आपल्या तालुक्याला आपल्यातील अधिकारी मिळाले हे आपल्या तालुक्याचे भाग्य आहे. यामुळे तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागली आहे.
बाळासाहेब धनवे सारखा सिंघम अधिकारी आपल्या तालुक्याला लाभणे हे आपले भाग्य आहे. काम करणाऱ्या शिक्षकांवर कौतुकाची थाप पडत आहे तर कामचुकार शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत कारवाई होत आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता वाढीस लागली आहे.