टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- 13 मार्च रोजी बीड जिल्हा येथे रोलर स्केटिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये टीम टॉपर्स अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून विविध पदके पटकावित आपल्या अकॅडमी चे नाव उंचावले आहे. सदर स्पर्धेमध्ये बीड अहमदनगर औरंगाबाद जालना कडा आष्टी येथील अनेक स्केटिंग खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अकॅडमीच्या खेळाडूंचा निकाल पुढील प्रमाणे 6 वर्ष वयोगटातील मुली वेदिका चिदगावकर (सुवर्णा), धुवी शहा (सुवर्ण), शर्वरी बारसे (रौप्य), अनन्या रचा (सुवर्णा). 8 वर्ष वयोगटात मुले कार्तिक नन्नवरे (सुवर्ण), युग कांक्रिया (रौप्य), साद शेख (कास्य), 10 वर्ष वयोगटातील मुले आदर्श विश्वास (सुवर्ण), अहेम गुगळे (रौप्य), सुजल घालमे (रौप्य), सोहम वडझिरकर (कास्य), 12 वर्ष वयोगटातील मुले सौरभ खडेलवाल (सुवर्ण), रुद्र निकम (सुवर्ण), 14 वर्षे वयोगटातील मुली जागृती बागल (सुवर्ण), व मुले विश्वजीत कर्डिले (सुवर्ण), खेळाडूंनी आपली कामगिरी बजावली. नगर जिल्ह्यात चालणाऱ्या एक मेव टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी तर्फे चालविण्यात येणाऱ्या कै.पुंडलिकराव भोसले स्केटिंग ग्राउंड बुरूडगाव रोड. किडझी स्कूल, वाडियापार्क, वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब सावेडी, येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे, प्रशिक्षक सागर भिंगारदिवे, सहप्रशिक्षक कृष्णा अल्लाट यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पद्धतीने सराव करतात. वरील सर्व खेळाडूंना अकॅडमी चे उपाध्यक्ष सागर कुकडवाल, खजिनदार अँड आसिफ शेख व अँड.गौरव डहाळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.