कोळगाव येथील ” त्या” संतापजनक प्रकाराबाबत अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा: आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन

अहमदनगर दि.१३ जुलै (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील काही गावकऱ्यांनी येथील मागास प्रवर्गातील युवक आकाश विकास कदम याला मुलीची छेड काढतो या संशयावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.याबाबत आरपीआय (आंबेडकर) गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की आकाश कदम या युवकाला मुलीची छेड काढत असल्याच्या संशयावरून कोळगाव येथील नंदकुमार लगड (कोळगाव सोसायटी चेअरमन),मनोज लगड, गोटू लगड,बंडू कवडे,कावेरी धोंडगे (सर्व राहणार कोळगाव ,ता.श्रीगोंदा) कदम यास जातीवाचक शिवीगाळ करत डोक्याचे केस काढून अर्धनग्न धिंड काढली. व या युवकास बेदम मारहाण केली.या प्रकरणी कदम या युवकाने बेलवंडी गटाचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तक्रार घेतली नाही. सदर संतापजनक प्रकाराबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिले आहे. निवेदनात पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्याबरोबरच जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्याबाबत अनुसूचित जाती जाती जमाती अंतर्गत अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) गटाच्या वतीने जिल्हाव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख रोहितभाऊ आव्हाड,तालुका अध्यक्ष गणेशभाऊ गायकवाड,युवक शहर अध्यक्ष संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.