प्रशासकिय
निवृत्तीवेतन, कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करावा

अहमदनगर दि. 3 नोव्हेंबर (प्रतिनिधी ):- महाराष्ट्र कोषागार नियम 1968 चा नियम 355 अन्वये दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला देणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सर्व निवृत्तीवेतन, कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांच्या याद्या संबंधित बँकांकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये जाऊन हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी यादीमधील नावासमोर निवृत्तीवेतन, कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांनी स्वाक्षरी करावी. बँकेमध्ये जाताना आधारकार्ड व पॅनकार्ड सोबत घेऊन जावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.