चापडगाव ते प्रभूवाडगाव जुना मुंगी रस्त्याची झालेली दुर्दशा तत्काळ दुरुस्त करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी-माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे

नगर प्रतिनिधी दि.(21ऑक्टोबर )शेवगाव तालुक्यातील चापडगाव ते प्रभूवाडगाव हा जुना मुंगी पुनर्वसन रस्ता रहदारीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा असून तो आपल्या मार्फत लवकरात लवकर करावा अशा आशयाचे निवेदन जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली चापडगाव व प्रभूवाडगाव येथील ग्रामस्थांनी अहमदनगर येथील जलसंपदा भवन मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.स्वप्निल देशमुख यांना अहमदनगर येथे दिले.
यावेळी निवेदनात पुढे म्हंटले आहे की, शेवगाव तालुक्यातील मौजे चापडगाव ते प्रभूवाडगाव हा पुनर्वसन जुना मुंगी रस्ता आहे. चापडगाव ते प्रभूवाडगाव हे अंतर अडीच कि.मी. चे आहे. या जुन्या रस्त्याने चापडगाव मधील ८०% लोकांचे शेत जमिनी, लोकवस्त्या रस्त्यावर आहेत. परंतु सदरचा रस्ता हा अतिशय खराब झाला आहे. मुंगी हे गाव पुनर्वसित गाव आहे. त्याला जोडणारा हा जवळचा रस्ता आहे. या रस्त्याने शेतकऱ्यांना पायी जाणे येणे अवघडही आहे. तसेच शेतीचे मशागतीसाठी बैलगाड्या, ट्रॅक्टर साधनांची ने-आण करणे अत्यंत परिश्रमाचे होतात. शासनाने या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आम्ही नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही सदरचा रस्ता दुरुस्त होत नाही. याच रस्त्याचे प्रभूवाडगाव, खिर्डी, खामपिंपरी या गावातील गावकरी मुले मुली चापडगाव या ठिकाणी सायकल वरून व पायी शाळेसाठी, दळणवळणासाठी येतात. त्यांना सुद्धा खूप त्रास या खराब रस्त्यामुळे होत आहे. पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी दुसऱ्या रस्त्याने दोन-तीन कि.मी.चे वाढीव अंतरावरून शाळेत यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. जर या रस्त्याचे काम आपण केले तर खामपिंपरी खिर्डी, प्रभूवाडगाव, चापडगाव येथील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. त्यांचे सदरच्या रस्त्याअभावी ६-७ कि.मी.दूरच्या रस्त्यावरून येण्याचे कष्टही थांबतील. असेही निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी राजेंद्र पातकळ, जगन्नाथ बोडखे, लक्ष्मण पातकळ, संतोष गायकवाड, राजू निकाळजे, अण्णासाहेब गोरे, गणेश गोरे, शिवाजी गोरे, सुधाकर गोरे, नामदेव ढाकणे, ज्ञानदेव घोडेराव, अशोक गायकवाड, विठ्ठल गमे, प्रल्हाद गायकवाड, बबन गायकवाड, भारत गायकवाड, भगवान गायकवाड, बंडू गायकवाड, अशोकराव पातकळ, अजिनाथ ढाकणे, देवराव बटूळे, नंदू सोनावणे, मोहन लहासे, विनायक लहासे, विष्णू चित्ते, अंबादास लहासे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.