सामाजिक

धम्म रथ अभियानाचे अहमदनगर शहरात भव्य स्वागत: अजय साळवे

अहमदनगर दि. 20 ऑक्टोबर (प्रतिनिधी)- धम्म अभियानाच्या वतीने देहू रोड (धम्मभूमी) ते नागपूर (दीक्षाभूमी) येथे १६ वर्षापासून धम्म रथाचे आयोजन करण्यात येते. धम्म रथाचे नगर शहरातील नील क्रांती चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले. धम्म अभियान आयोजन समिती, अहमदनगर जिल्ह्यात समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज येथे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हार घालून रथाचे माळीवाडा येथे विजय भांबळ, धर्मा चाबुकस्वार, सुशील घंगाळे यांनी स्वागत केले. अभियान समितीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला. व नीलक्रांती चौक येथे धम्म रथाचे स्वागत करण्यात आले यावेळी अजय साळवे, विलास साठे, प्रा. डी.आर जाधव, प्रा.रत्नाताई वाघमारे, प्रा.जयंत गायकवाड, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, डॉ.प्रा.प्रशांत साळवे, महेश भोसले यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात धम्म रथाची मिरवणूक काढण्यात आली. तेथेच सभेचे आयोजन करण्यात आले स्वागत अध्यक्ष अजय साळवे यांनी धम्मासाठी सर्वांनी एकत्र होण्याचे आव्हान करत रताचे स्वागत केले निमंत्रक प्रा.डी.आर.जाधव यांनी धम्म हा मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे. याचे जीवनात महत्त्व सांगितले रत्नाताई वाघमारे यांनी पुढील भविष्य अत्यंत खडतर असून संविधान पायदळी तुडवले जात असताना आपण षढ झालो का? असा रोखठोक प्रश्न विचारून आंबेडकरी जनतेने सतर्क रहावे असे आव्हान केले. प्रा.डॉ.दि.वा. बागुल यांनी मार्गदर्शन करताना शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे असून त्यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून प्रथम जयंती साजरी केली. म्हणून इतरांनी गणेश उत्सव सुरू केला. स्पर्धा परीक्षा मधून अधिकारी भरती होते. असे घटनेत सांगितले परंतु घटना कमकुवत करून अधिकारी भरले जात आहे. धम्म घराघरात पोहोचवण्याचा हेतू असल्यामुळे धम्मरथ देहूरोड (धम्मभूमी) ते नागपूर (दीक्षाभूमी) येथे धम्म जागृतीसाठी निघालेले आहे. 1956 ला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली तो दिवस विजयादशमीचा होता. विजयादशमी हाच धम्माच्या परिवर्तन दिन आहे. धम्म अभियान समिती महाराष्ट्राच्या वतीने देण्यात येणारा आदर्श बौद्ध कुटुंब पुरस्कार प्रशांत साळवे व प्रज्ञा साळवे यांना गौरवण्यात आले. अहमदनगर समितीच्या वतीने नगर शहरातील आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीलक्रांती मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी रजिस्टर पदी संदीप सदाफुले यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्व समाज बांधवांना भोजनदान देण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे