प्रशासकिय
शासकीय निमशासकीय, खासगी कार्यालये व परिसरात कोटपा 2003 कायद्याची काटेकोर अंमबजावणी करा:जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. 19 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) :- शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये तसेच कार्यालयांच्या परिसरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोटपा 2003 कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी एका आदेशाद्वारे दिल्या आहेत.
सर्व शासकीय कार्यालये, संस्था, कार्यालयाचा परिसर, प्रवेशद्वार तसेच प्रत्येक मजल्यावर धुम्रपान निषेध क्षेत्र अथवा तंबाखूजन्य पदार्थ वर्जित क्षेत्र, कार्यालये व संस्थांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे, बाळगणे अथवा थुंकल्यास कोटपा 2003 कायद्यांतर्गत 200 रुपये पर्यंत दंडात्मक कार्यवाही केली जाईल अशा आकाराचे फलक स्वच्छ व ठळक अक्षरात लावण्यात येऊन या कायद्याची काटेकोरपणे अंमबजावणी करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.