महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (ओ) प्रमाणे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे मनाई आदेश जारी

अहमदनगर दि. 1 मे (प्रतिनिधी ):- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (ओ) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी १३ मे, २०२४ पर्यंत जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघात कोणत्याही इसमास खालील कृत्य करण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.
कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने जमावातील व्यक्तींची किंवा रस्त्यावर चालणाऱ्या मिरवणुकीतील व्यक्तींची वर्तणूक व वागणूक किंवा कृती या संबंधी तसेच मिरवणुकीच्या बाबती त्यांनी ज्या मार्गाने व पद्धतीने व ज्यावेळी जावे ते मार्ग ती पद्धत व त्या वेळा हे नियम पाळण्याविषयी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ (ओ) प्रमाणे आदेश दिले आहेत.
याबाबत कोणास सवलत अगर परवानगीची आवश्यकता असल्यास लोकसभा मतदारसंघातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या क्षेत्रात प्रसंगानुसार आवश्यक ते कोणत्याही नियमांचे, आदेशांचे उल्लंघन होणार नाही अशारितीने आवश्यक ते आदेश देण्याचा अधिकार प्रदान केला असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.