जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीबाबत मा.खासदार कवाडेंनी केली कार्यकर्त्यांशी चर्चा
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जिल्ह्याचा घेतला आढावा

अहमदनगर (प्रतिनिधी) मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी राज्यात लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीस ग्रामीण भागातून खूप महत्त्व असते. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अद्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे हे राज्याच्या दौऱ्यावर असून ते पुणे येथे जात असताना येथील शासकीय विश्राम गृहावर त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांशी आगामी निवडणूकीबाबत चर्चा करत पक्ष संघटन वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड़ यांनी त्यांचे स्वागत केले या प्रसंगी प्रदेश सहप्रवक्ते प्रा.जयंत गायकवाड़ ,सुनील क्षेत्रे ,नितिन कसबेकर ,महिला अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे ,सुरेश भिंगारदिवे अतुल भिंगारदिवे ,योगेश थोरात ,सागर ठोकळ ,किरण जाधव ,अक्षय बोरुडे ,संघराज गायकवाड़ ,मनोज ठोम्बे ,शुभम बड़ेकर , आदि कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते.