व्यसनमुक्ती कार्याबद्दल ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष शिंदे यांचा गौरव विशेष पोलिस महानिरीक्षक शेखर पाटील यांच्या हस्ते स्वीकारले प्रमाणपत्र

अहमदनगर दि.७ जुलै (प्रतिनिधी) – व्यसनमुक्तीबाबत सोशल मीडिया व सामाजिक क्षेत्रात जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करण्याचे काम केल्याबद्दल स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष शिंदे यांचा पोलिस दलाच्या वतीने विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मंगळवारी (५ जुलै) माऊली सभागृहात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. विदुलता शेखर पाटील, डॉ. हर्षल पटारे, डॉ. दीप्ती करंदीकर उपस्थित होते. स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे हे समाजातील गरजू घटकांना मदत करतात. तसेच गरीब विद्यार्थी, वंचित यांच्यासाठी व व्यवनमुक्तीवरही कार्य करत आहेत. या कार्याची पोलिस दलाने दखल घेत शिंदे यांचा गौरव करण्यात आला.
दारूमुळे मी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले आहे. व्यसन करायचे असेल तर चांगल्या कामाचे व्यसन करा, असे आवाहन यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे यांनी केले.