श्रीगोंदा- लिंपणगाव ते शेंडेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याची ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मागणी

लिंपणगाव (प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा लिंपणगाव ते शेंडेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करण्यात यावी. अशी मागणी लिंपणगाव शेंडेवाडी बाबरवाडी कोयतेवस्ती येथील ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत येथील ग्रामस्थांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अहमदनगर यांना यापूर्वीच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे लिंपणगाव अंतर्गत असणारी शेंडेवाडी येथे जाणारा रस्त्याचा वाहतूक निरीक्षक प्रशिक्षण लिंपणगाव ते शेंडेवाडी मार्गाचा सर्वे करून गेल्यानंतर रोड दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. नंतर बस सेवा सुरळीत होईल असे सांगण्यात आले होते, त्यानंतर ग्रामस्थांनी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दिनांक 25 मे 2017 रोजी रस्ता दुरुस्ती संदर्भात प्रस्ताव सादर केला होता. याबाबत त्यांनी 30 ते 35 लाखाचा निधी जिल्हा विकास आराखड्यातून शेंडेवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यासाठी मंजूर करून दिला होता. असे सांगून काही ग्रामस्थांनी म्हटले आहे की, गेली दोन ते तीन वर्षापासून कोविड 19 च्या साथी रोगामुळे लॉक डाऊन करण्यात आले होते. त्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झालेला निधी तूर्त थांबवण्यात आला होता. त्यानंतर 2022 मध्ये तीन किलोमीटर रोडचे डांबरीकरण झाले आहे. असे सांगून ग्रामस्थांनी पुढे म्हटले आहे की, लिंपणगाव ते शेंडेवाडी रोडचा सर्वे करण्यास वाहतूक निरीक्षक प्रशिक्षण यांना आदेश द्यावेत. जेणेकरून आमच्या येथील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रवासी यांचा बस सेवेचा नियमितपणे बस सुरू होणे बाबतचा प्रश्न मार्गी लागेल. व शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये वेळेवर हजर राहण्यास खूप मदत होईल अशा सूचना शेंडेवाडी, बाबरवाडी, कोयतेवस्ती येथील ग्रामस्थांनी मांडल्या आहेत.
दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी कोविड 19 च्या साथी रोगामुळे शिक्षणावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. सध्या कॉलेज सुरळीतपणे चालू झालेले आहेत. तरी आपण लवकरात लवकर लिंपणगाव ते शेंडेवाडी रस्त्याचा सर्वे करून विद्यार्थी व प्रवाशांना श्रीगोंदा, लिंपणगाव, शेंडेवाडी बस सेवा सुरू करण्याचे आदेश आगार व्यवस्थापक श्रीगोंदा यांना द्यावेत अशी मागणी शेंडेवाडी, लिंपणगाव, बाबरवस्ती, कोयतेवस्ती येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे.
सद्यस्थितीला दोन-तीन महिन्यापूर्वी झालेल्या या तीन किलोमीटर अंतराच्या नादुरुस्त रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आलेले असून, आता उर्वरित साईट पट्ट्यांची कामे संबंधित ठेकेदारांनी हाती घेतल्याचे समजते. त्यामुळे लिंपणगाव शेंडेवाडीकडे सेवा सुरळीत करण्यासाठी अडचण येणार नाही. असे देखील लिंपणगाव, शेंडेवाडी, बाबरवाडी येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.