प्रशासकिय

लोणी येथील चाळीस वर्षांपासून प्रलंबित १२६ गटांचे गाव नकाशे दुरूस्त महसूलमंत्र्यांच्या सूचनेनुसार महसूल व भूमि अभिलेख विभागाची संयुक्त मोहीम

शिर्डी , दि. ११ डिसेंबर – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचनेनुसार लोणी बुद्रूक येथील १२६ गटांच्या गाव नकाशाची दुरूस्ती करण्यात आली आहे‌. महसूल व भूमि अभिलेख विभागाने ही संयुक्त मोहीम राबवत ४० वर्षांपासून रखडलेले सदोष गाव नकाशे दुरूस्त करण्याचे उल्लेखनीय काम पूर्ण केले आहे‌‌. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे ‌.

लोणी बुद्रूक येथील गाव नकाशात प्रत्यक्ष जागेवरील वस्तूस्थितीप्रमाणे गटांचे स्थान सदस्य पद्धतीने दर्शवण्यात आलेले होते. राहाता तालुका भूमि अभिलेख विभागाने लोणी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या मदतीने याबाबत ग्रामस्थांकडून दुरूस्ती साठी अर्ज मागविले होते.

सदर गाव नकाशांची सातबारा उताऱ्यामध्ये दुरुस्ती झालेली होती. मात्र गाव नकाशामध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे सदर नकाशे सदोष दिसून येत होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहाता तहसीलदार कुंदन हिरे,भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सुनिल इंदलकर, उपअधीक्षक नरेंद्र पाटील व शिरस्तेदार शैलेंद्र कचरे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.

दुरुस्ती नकाशे लोणी येथील तलाठी व भूमीअभिलेख कार्यालयात उपलब्ध आहेत. खातेदारांनी पहाणी करून काही हरकत असल्यास नोंद करावी. असे आवाहन भूमी अभिलेख उपअधीक्षक नरेंद्र पाटील यांनी केले आहे .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे