अहिल्यानगर दि. 13 नोव्हेंबर (प्रतिनिधी )अहिल्या नगर नगर शहर मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि.11 नोव्हेंबर) पाइपलाईन रोड, शीला विहार चौक, श्रीरामचौक आदी परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. उपनगरात निघालेल्या प्रचार रॅलीस नगरकरांचा उत्साह दिसून आला. तर जेसीबीद्वारे हलगीच्या निनादात फुलांचा वर्षाव करण्यात आला. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाल्या होत्या. प्रचारासाठी आलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जगताप यांची गळाभेट घेतली.यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.