देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि. 13 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) आपल्याला आमदार संग्राम जगताप यांना का निवडून आणायचे तर? याचे उत्तर असे आहे कि, नगर शहरात ज्या प्रमाणे आमदार जगताप यांनी बौद्ध विहारे, समाज मंदिरे बांधून दिली. त्याप्रमाणे त्यांनी भिंगार मध्येही बौद्ध विहारे व समाज मंदिरे बांधून दिली आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांनी भिंगार येथे आयोजित बैठकीत केले. बैठकीच्या अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
बुधवार 11 नोव्हेंबर रोजी जेष्ठ नेते सुनील शिंदे, आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर विधानसभा मतदार संघांचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुढे बोलतांना बनसोडे म्हणाले, आम्हाला भिंगारमध्ये जागा उपलब्ध करून दया नगर शहरात ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. त्याप्रमाणे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारने भिंगार मध्येही आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारू, होम मिनिस्टर सारख्या स्पर्धा घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी महिलां मधील कला गुणांना संधी दिली आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला अनु. क्रमांक 4 व घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आमदार संग्राम जगताप यांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी पंचशीलनगर येथील नागरिकांना केले.
यावेळी जेष्ठ नेते सुनील शिंदे बोलतांना म्हणाले, जगताप कुटुंब हे विकासाचे व्हिजन असलेले कुटुंब आहे. अरुण काका जगताप यांनी नेहमीच फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला बरोबर घेऊन काम केले आहे. त्याच प्रमाणे आमदार संग्राम जगताप यांचे कार्य सुरु आहे. या निवडणुकीत आमदार जगताप यांना भिंगार मोठे मताधिक्य देण्याची विनंती त्यांनी केली.
यावेळी माजी कॅन्टोन्मेंट उप अध्यक्ष सुनील काळे, माजी सरपंच युवराज पाखरे, सुजित घंगाळे, आरपीआय आठवले गटाचे नाना पाटोळे, भिंगार शहर अध्यक्ष मंगेश मोकळ, दया गजभिये,सिद्धार्थ आढाव, समीर भिंगारदिवे, अंकुश मोहिते,गौतम कांबळे, महेश भिंगारदिवे, वनिता गायकवाड, काजल कांबळे, शारदा ठाकूर, पूजा पाठक आदी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.या बैठकीचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमित काळे यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा