कृषीवार्ता

चांदे खुर्द मध्ये लम्पिवर चर्चा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केलं मार्गदर्शन

कोभळी (प्रतिनिधी ) दि 25 सप्टेंबर चांदे खुर्द मध्ये लम्पी स्कीन आजारावर मार्गदर्शन केले यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ न्यानेश्वर गंगार्ड यांनी लम्पी रोगाचा पसार , गोचीड व डास चिलटे बाधित जनावरे यांच्यापासून प्रत्यक्ष स्पर्शाने सावधानगिरी बाळगणे नियंत्रण करणे, रोगाची कारणे, जनावरे एकत्र न आणणे ,जनावरांवर उपचार करताना नवीन सिरीजचा वापर करावा, गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती अथवा डॉक्टर आल्यास निर्जंतुक करावे, पशुपालक यांनी घ्यावयाची काळजी गोठा ची फवारणी करणे, साथीचे रोग चालू असतात बाजारातून जनावरे न आणणे , जनावरांची खरेदी विक्री थांबवणे जानकर बाधित झाल्यास वेगळे ठेवणे , रोगाची कारणे , हा रोग विषाणूजन्य आहे , अतिशय संसर्गजन्य जन्य रोग आहे देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स प्रवर्ग मधील आहे , लक्षणे अंगावर 10 ते 20 मी मी व्यासाच्या गाठी , सुरवातीला भरपूर ताप ,डोक्यातून नाकातुन चिकट रक्तस्राव होणे ,चारा पाणी न खाणे, दुग्ध उत्पन्न कमी होणे , काही जनावरांना पायावरती सूज येणे हे लक्षणे दिसल्यास पशुअधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचं अहवान यावेळी केल डॉ न्यानेश्वर गांगर्डे यांनी 3 पेक्षा जास्त जनावरे जर एकत्र आलेस गुन्हा दाखल करण्या येणार आहे असे उपस्थिती शेतकरी याना सांगितले ,मार्गदर्शन कोभळी सर्कल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ न्यानेश्वर गांगर्डे ,पशुवैद्यकीय परिचर श्री शाम चौकटे माजी सरपंच प्रल्हाद सुर्यवंशी माजी सरपंच अर्जुन सुर्यवंशी ,युवराज सुर्यवंशी कुंडलिक सुर्यवंशी, नाबाजी सुर्यवंशी,भाऊ गावडे ,राघू भरणे , बाबुराव सुर्यवंशी, जगनाथ सुर्यवंशी, आबा जगधने, दगडू सुर्यवंशी, राम सुर्यवंशी, रवी थोरात ,बापू गुरव ,सुरेश गुरव ,गौतम सूर्यवंशी ,दादा सुर्यवंशी, सुनील सुर्यवंशी ,महादेव गावडे , बाळु सुर्यवंशी, अनिल भिसे व शेतकरी उपस्थिती होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे