प्रशासकिय

समान संधी केंद्र” च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन ; सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम ‍जिल्ह्यात २६७ महाविद्यालयांमध्ये ‘समानसंधी’ केंद्र स्थापन

अहमदनगर, दि.२४ सप्टेंबर (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच “समान संधी केंद्र” सुरु केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकास व गुणवत्ता वाढीसाठीसह मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हयात कार्यरत ३११ कनिष्ठ व वरिष्ठ तसेच ३२९ व्यावसायिक अशा एकूण ६४० महाविद्यालयांपैकी केवळ २६७ महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन झाली आहेत. उर्वरित महाविद्यालयाने “समान संधी केंद्र” स्थापन करुन उपक्रमाचा अहवाल २६ सप्टेंबर २०२२ पूर्वी समाज कल्याण विभागाकडे सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुंलीना शिष्यवृत्ती, फ्रिशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करणे तसेच संवाद अभियान-युवा संवाद यासारखे कार्यक्रम सुरु करण्याकरीता आता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यासाठी “समान संधी केंद्र” स्थापन करण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांनी निर्देशित केले आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक, एक सहायक व किमान पाच विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच “समान संधी केंद्र” करावे.
केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारीत विकासासह त्यांचे सर्व मार्गदर्शक सूचनामध्ये देखील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या केंद्राच्या माध्यमातून उपयोजना करण्याचे ठरवले आहे. “समान संधी केंद्र”च्या माध्यमातून विद्यार्थ्याना त्यांच्या पुढील शिक्षणसाठी प्रोत्साहित करणे,रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबीचा सर्वसमावेशक मार्गदर्शन याव्दारे करण्यांत येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय,वरिष्ठ महाविद्यालय तसेच इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखालील येणाऱ्या सर्व महाविद्यालयामध्ये “समान संधी केंद्र” स्थापन करुन समन्वय अधिकारी व सहायक म्हणून नियुक्त केलेल्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप भ्रमणध्वनी क्रमांकासह स्थापन केल्याबाबतचा अहवाल सहायक आयुक्त, समाजकल्याण, अहमदनगर यांचे कार्यालयास सादर करावा. असे आवाहनही श्री.देवढे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे