- अहमदनगर ( प्रतिनिधी) :- नगर शहरातील टिळकरोड येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची संरक्षक भिंत तोडून अतिक्रमण केल्याबाबत व स्मारकामध्ये निरूपयोगी साहित्य ठेवल्याबाबत तसेच डॉ.आंबेडकर स्मारक नुतनीकरण करण्याबाबत सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्व भिमसैनिक यांनी आंबेडकर स्मारक या ठिकाणी जमा होऊन प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले
.आयुक्त यांना सोबत घेऊन आंबेडकर स्मारक या ठिकाणी येऊन पाहणी करुण सगळे स्मारक फिरून दाखवून लवकरात लवकर कारवाई व नुतनीकरण करावे असे सर्वांच्या वतीने मागणी करण्यात आली. तसेच आयुक्त यांनी ही लवकरात लवकर येत्या 14 एप्रिल २०२२ पर्यन्त स्मारकचे नुतनीकरण करुन लवकरच सर्वांसाठी खुले करण्यात येईल याचे आश्वाशन देण्यात आले या वेळी सर्व समाजातील नागरीक यावेळी उपस्थित होते .यावेळी मा.नगरसेवक अजय साळवे,नगर सेवक प्रशांत गायकवाड़ ,रोहित आव्हाड ,सुमेध गायकवाड़, संजय कांबळे,नितिन कसबेकर ,सुरेश बनसोडे , संदीप वाघमारे ,योगेश थोरात,सागर ठोकळ ,विजय गायकवाड़, सोमा शिंदे ,सचिन शेलार ,दिनेश पंडित ,बंटी भिंगारदिवे, यशवंत भांबळ,आकाश निरभवने ,वैभव जाधव ,जय कदम,दया गजभिये ,शनैश्वर पवार ,शुभम बड़ेकर आदि प्रमुख कार्यकर्ते व भीमसैनिक उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा