फुले ब्रिगेड च्या वतीने किशोर डागवाले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

अहमदनगर दि१० मे (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किशोर डागवाले यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगर शहर फुले ब्रिगेडच्या वतीने त्यांचा सत्कार करताना फुले ब्रिगेडचे शहर अध्यक्ष दीपक खेडकर समवेत रोहन डागवाले, सुनील सूर्यवंशी, ब्रिजेश ताठे, किरण जावळे, महेश गाडे, संतोष हजारे, प्रसाद बनकर, अंकुश पडोळे, किरण पंधाडे, संकेत ताठे, विश्वास शिंदे, संकेत लोंढे, अक्षय जाधव, नितीन डागवाले, संदीप दळवी, महेश सुडके, निखिल ताठे, संतोष उडे, उद्धव बडे, आशीष भगत, गणेश जाधव, संदीप नामदास, प्रसाद शिंदे, निलेश खळतकर, तेजस दळवी आदी उपस्थित होते. यावेळी दीपक खेडकर म्हणाले की किशोर डागवाले यांच्या कार्याची दखल घेत. त्यांना ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पद दिले आहे. तसेच किशोर डागवाले यांच्या माध्यमातून ओबीसींचे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर सत्काराला उत्तर देत किशोर डागवाले म्हणाले की मला मिळालेल्या प्रदेश उपाध्यक्ष पद जबाबदारी वाढवणारे आहे. सर्वांना बरोबर घेत जिल्ह्यात ओबीसी मोर्चाचे काम तळागाळापर्यंत जाऊन करणार असून फुले ब्रिगेड च्या वतीने केलेला सत्कार प्रेरणादायी असल्याचे म्हणाले.