खासदार सुजय विखे सह बहुजन शिक्षण संघ, आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या माजी नगरसेवक अजय साळवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अहमदनगर दि.२१ (प्रतिनिधी) आरपीआय (आठवले) गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक अजय साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुजय विखे यांनी त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा संदेश पाठवत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बहुजन शिक्षण संघाच्या वतीने त्यांचा दादासाहेब रूपवते विद्यालय येथे शाल व पुष्गुच्छ देत सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य रवींद्र एडके,पर्यवेक्षक प्रा.जयंत गायकवाड,नितीन कसबेकर, पत्रकार महेश भोसले,प्रा.सुनील बर्डे,संजीवन साळवे सर,संदीप सदाफुले,प्रा.रायकर सर, बंदावणे मॅडम भीमा जाधव आदी उपस्थित होते.
**** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांनी साळवे यांचा शाल व राजमाता जिजाऊ यांचे पुस्तक भेट देत सत्कार केला.यावेळी अंकुश मोहिते,दिवटे उपस्थित होते.
****पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,विशाल गायकवाड,सामजिक कार्यकर्ते बापू विधाते,प्रा.भीमराव पगारे,प्रा.संदीप पाखरे,राजू ससाणे आदींनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.