कायम संघर्षशील असलेले संतोष जिरसाळ हे लिंगायत संघर्ष समितीच्या कक्षा रुंदावतील : काका कोयटे
संतोष जिरेसाळ यांची लिंगायत संघर्ष समितीच्या नगर जिल्हाध्यक्ष पदावर निवड

पाथर्डी (प्रतिनिधी)
लिंगायत समाजातील पोटजातींमध्ये उच्चवर्णीय – कनिष्ट असा भेदभाव करणे म्हणजेच महात्मा बसवेश्वर यांच्या मूळ विचारधारेशी केलेली प्रतारणाच असून बसवेश्र्वरांच्या समतेच्या विचारांचे पाईक असलेले संतोष जिरेसाळ यांच्या माध्यमातुन लिंगायत संघर्ष समितीचे कार्य जिल्हाभरात अधिक जोमाने चालु राहील असे प्रतिपादन लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री.काका कोयटे यांनी केले.लिंगायत संघर्ष समितीच्या पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये लिंगायात संघर्ष समिती महाराष्ट्र च्या नगर ( दक्षिण-उत्तर ) जिल्हाध्यक्ष पदावर पाथर्डी येथील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते तथा मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांची सर्वानुमताने निवड करण्यात आली,यावेळी संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलअण्णा रुकारी,कार्याध्यक्षा सरलाताई पाटील,कोष्याध्यक्ष राजाभाऊ मुंडे,युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साखरे,कार्यकारणी सदस्य गुरुनाथ बडूरे,माजी सनदी अधिकारी रामदास पाटील,सतीश नीळकंठ,गिरीषअप्पा सोनेकर,मनोज गणमुखी आदींसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काका कोयटे यांनी सांगीतले की,लिंगायत संघर्ष समितीच्या माध्यमातुन मागील दहा वर्षापासून समाजातील पोटजातीना ओबीसी आरक्षण मिळवीण्याकरिता संघर्ष सुरु असून मागील सरकारच्या कार्यकाळात राज्यभरात केलेल्या आंदोलनाचे फलीत म्हणून समाजातील बहुतेक पोटजातीना आरक्षणाचा लाभ मिळवुन देण्यात आम्हीं यशस्वी झालोत,आता ज्यांचे दाख्यल्यावर फक्त लिंगायत असे नमूद केलेले आहे त्यांचेसह राहिलेल्या सर्व पोटजातीना ओबीसी आरक्षण मिळवुन देण्यासह महात्मा बसवेश्वर यांचे भव्य स्मारक त्यांची कर्मभूमी असलेले सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारणी करणे,समाजातील गरजवंताला आर्थिक मदत करण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत यासाठी समाजातील उच्च-कनिष्ट असा भेद मिटवून सर्व पोटजातीना एकत्रित करून सर्वसमावेशक असे संघटन करणे हेच प्रमुख ऊदिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.संतोष जिरेसाळ यांनी समाजाचे स्मशाभूमीतील बेकायदा आरक्षण,तेथील समस्या निराकरण,बसवेश्वर महाराजांची जयंती शासनस्तरावर साजरी करणे आदीसह समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कायम संघर्ष केला आहे,त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ,समोपचार व सचोटीने कार्य करण्याची क्षमता पाहूनच जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना समितीचे नूतन जिल्हाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी सांगीतले की महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जातीभेद नष्ट करण्यासाठीं समजातील आपल्या कर्माने किंवा त्यावेळीं करत असलेल्या कामामुळे दलीत- वंचित ठरवलेल्या अठरापगड जातींना मायेने आपलेसे करून “कायकवे कैलास” म्हणजे कामामध्ये देव आहे असा मंत्र देऊन त्यांचे गळ्यामध्ये इश्टलिंग म्हणजेच साक्षात शिवशंकर भगवान यांचीच स्थापना करून सर्व लिंगायत बांधवांना ईश्वरप्राप्तीसाठी भक्तीचा सोपा मार्ग दाखविला त्याच अनुयायांना आजही आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे,महात्मा बसवेश्वर यांच्या समतेच्या मार्गातील जिल्ह्यातील सर्व पोटजातींतील भेद मिटवून समाजहिताचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या,उपक्रमशील व उमद्या विचारशैलीतील युवक- युवती,नागरीकांचे संघटन करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष समितीच्या माध्यमातुन कार्य करण्यात येणार असुन जास्तीत जास्त समाज बांधवांनी संघर्ष समितीसोबत काम करावे,काका कोयटे यांच्या सारखे समाजासाठी पोटतिडकीने काम करणारे दुरगामी,आदर्श व्यक्तिमत्त्व पाठीशी असताना कार्य करण्याची नवीन उर्जा मिळत असुन संघर्ष समितीच्या कक्षा वाढविण्यावर आपला भर असेल व याचसाठी जिल्हा – तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांनी आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन केले.
संतोष जिरेसाळ यांच्या झालेल्या या निवडीबद्दल पाथर्डी शहारातील समाजबांधव सर्वश्री दयानंद जिरेसाळ,सचिन फुटाणे,शिवानंद कराडकर,संतोष बुरसे,प्रसाद फुटाणे,शुभम जिरेसाळ,बाळासाहेब जिरेसाळ,प्रभाकर इजारे,राजेंद्र उदारे, पुरुषोत्तम भैय्या ईजारे,सोमनाथ जिरेसाळ,शुभम जिरेसाळ,शिवाजीराव सुपेकर,विठ्ठलराव हंपे,अभिजित गुजर,संतोष मेघुंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.