ब्रेकिंग

पै सुदर्शन पुढच्या वर्षी नगरसाठी सुवर्ण पदक जिंकेल, जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी व्यक्त केला आशावाद

महाराष्ट्र केसरी कुस्ती कास्य पदक मानकरी पै. सुदर्शन कोतकरांचा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार

अहमदनगर दि.२३(प्रतिनिधी) : नुकत्याच सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नगरचा पै. सुदर्शन महादेव कोतकर ओपन १२५ किलो वजनी गटात कास्य पदकाचा मानकरी ठरला आहे. ही नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. यावर्षी जरी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी देखील पुढील वर्षी पै सुदर्शन नक्कीच नगरसाठी सुवर्ण पदक जिंकून आणेल, असा आशावाद शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.
पै.सुदर्शन याचा अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याने संपादित केलेल्या विजयाबद्दल काळे यांच्या हस्ते काँग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शिवसेना नगरसेवक संग्रामदादा शेळके, युवासेना शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर, पै.सागर गायकवाड, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, एनएसयूआयचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला आदी उपस्थित होते.
यावेळी किरण काळे म्हणाले की, महाराष्ट्र केसरी ही अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा आहे. सबंध महाराष्ट्राचे डोळे दरवर्षी या स्पर्धेच्या निकलाकडे लागलेले असतात. चुरशीच्या होणाऱ्या या स्पर्धेत पै. सुदर्शनने तिसरा क्रमांक पटकावला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तो पहिला ठरला आहे. तब्बल चौदा वर्षांनंतर आपल्या जिल्ह्याला पै. सुदर्शनच्या निमित्ताने कास्य पदक मिळाले आहे. ही नगरसाठी गौरवाची बाब आहे.
कोतकर कुटूंबियांना पैलवानकीची पार्श्वभूमी आहे. आगामी काळात नगरचे जास्तीत जास्त मल्ल राज्य पातळीवर कुस्तीच्या मैदानात चमकले पाहिजेत. यासाठी त्यांना सराव करण्याकरिता चांगल्या दर्जाच्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधा नगरमध्ये उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. आज अनेक मुलं हे तयारीसाठी कोल्हापूर, पुणे या परिसरात मोठ्या संख्येने जात असतात. मात्र पै. सुदर्शनच्या रूपाने नवीन मल्ल तयार होत असून हे भविष्यातील नगर जिल्ह्यात मल्ल घडविण्यासाठी वस्ताद म्हणून उत्तम कामगिरी पार पाडतील, असा विश्वास यावेळी किरण काळे यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे