राजकिय

केडगाव येथे अभिषेक कळमकर यांची प्रचार फेरी; तुतारीच्या बाजूने जनाधार देणार- नागरिकांची प्रतिज्ञा

अहिल्यानगर दि. 11 नोव्हेंबर (प्रतिनिधी )केडगाव येथे अभिषेक कळमकर यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिक, विशेषत: युवकांचा सहभाग पाहून वातावरण जल्लोषमय झाले होते. तुतारी चिन्हाच्या बाजूने जनाधार देण्याचा निर्धार केडगावकरांनी या प्रचार फेरीतून ठामपणे व्यक्त केला. “केडगाव यंदा तुतारी वाजवणार” असा जनतेचा जोरदार नारा या फेरीतून घुमत होता, ज्यामुळे मतदारांच्या मनात अभिषेक कळमकरांविषयी विश्वास आणि सकारात्मकता अधिक दृढ झाली आहे.
अभिषेक कळमकर यांनी या फेरीत केडगावकरांशी संवाद साधत त्यांना शहराच्या विकासासाठी विशेष योजना राबवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विशेषत: फक्त महिलांसाठी उपनगरात आरोग्य केंद्र उभारण्याचे वचन दिले, ज्यामुळे महिलांना सहज उपलब्ध असणारी आरोग्य सुविधा मिळेल. “केडगावचा सर्वांगीण विकास माझ्यासाठी प्राथमिकता आहे, आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या प्रचार फेरीत महाविकास आघाडीचे नेते विक्रम राठोड, दिलीप सातपुते, ओंकार सातपुते, संग्राम कोतकर,हर्षवर्धन कोतकर, अशोक दहिफळे, पप्पू भळे, मुन्ना भिंगरदिवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी अभिषेक कळमकर यांचे जोरदार स्वागत केले, त्यांना फुलांच्या वर्षावाने सन्मानित केले, तसेच शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून कळमकर यांना आशीर्वाद दिला.
शहरातील सर्ववर्गीय नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न कळमकर यांनी केला. रोजगार, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी, आणि सार्वजनिक सोयी-सुविधांचा विकास यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. केडगावकरांना आपल्या योजनांची माहिती देत असताना त्यांनी या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्रचार फेरीतून केडगावकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत अभिषेक कळमकर यांना तुतारी चिन्हावरून केडगावकरांचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे