देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या दिनांक 6 मे पासुन बौध्द राष्ट्रांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे मुंबईतुन 6 मे ला 6 दिवसांच्या बौद्ध राष्ट्रांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. सहा दिवसांच्या या बौध्द राष्ट्रांच्या दौऱ्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे प्रथम थायलँड त्यानंतर व्हिएतनाम आणि त्यानंतर कंबोडिया या तीन बौध्द राष्ट्रांचा दौरा करणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दीस्ट चे ते आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.जागतिक स्तरावर बौध्दांचे ते नेते म्हणुन लोकप्रिय आहेत.त्यामुळे व्हिएतनाम येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना बौध्द नेते म्हणुन प्रमुख पाहुणे म्हणुन निमंत्रीत करण्यात आले आहे.व्हिएतनाम मधील ” हो ची मिन्ह “येथे आंतरराष्ट्रीय बौध्द परिषदेत ते सहभागी होणार आहेत.व्हितनाम, थायलॅन्ड आणि कंबोडिया येथील वरिष्ठ बौध्द धम्म गुरु,बौध्द अभ्यासक विचारवंत यांची या दौऱ्यात ना.रामदास आठवले भेट घेणार आहेत.विविध विषयांवर वार्तालाप करणार आहेत.भारतातील बौध्दधम्म चळवळ आणि आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म चळवळीबाबत बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगाला कसे मार्गदर्शक आहेत याबाबत ही या बौध्द राष्ट्रां मध्ये ना .रामदास आठवले माहिती देणार आहेत.भारतात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्दधम्मचक्रप्रवर्तन करुन फार मोठी धम्म क्रांती केली आहे याची माहिती या बौध्द राष्ट्रांमध्ये ना.रामदास आठवले देणार आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा