राजकिय

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने स्वागत ;वरिष्ठांच्या मान्यतेने शहर शिवसेना कार्यकारणी लवकरच जाहीर करणार : किरण काळे

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर प्रतिनिधी : गेली तीन वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली ३ वर्षे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत. ही एक प्रकारे लोकशाहीची हत्याच होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुक प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाचे अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करत असल्याचे प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.काळे यांनी पुढे म्हटले आहे, ओबीसी आरक्षणा बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून या निवडणुका होतील असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्यां साठी या निवडणुका गरजेच्या आहेत. लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांतूनच नवीन नेतृत्व तयार होत असते. जरी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना निवडणूक आयोगास आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ घेण्याची मुभा दिलेली असली तरी राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये अशीच आमची अपेक्षा आहे. जनतेला देखील निवडणुका हव्या आहेत.

लवकर शहर कार्यकारणी :
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किरण काळे यांच्यावर शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. पदाचा पदभार स्वीकारल्यापासून काळे यांनी नव्या जुन्या शिवसैनिकांचा मेळ घालत पक्षात नवचैतन्य आणण्याचे काम सुरू केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणी गठीत करण्याच्या हालचालींना वेग दिला जात असल्याचे समजत आहे. याबाबत बोलताना काळे म्हणाले, जुन्या नव्या शिवसैनिकांचा मेळ घालत वरिष्ठांच्या मान्यतेने लवकरच कार्यकारणी जाहीर केली जाईल.

मनपा निवडणूक ताकदीने लढणार :
नगर मनपाचा कार्यकाळ संपून सुमारे दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. प्रशासकराज सुरू आहे. कचरा संकलन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची रखडलेली कामे, रंगभवनचे अपूर्ण काम, रुग्णालयाचे रखडलेले काम यासह शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या प्रतिनिधींचे राज्य आल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे आगामी मनपा निवडणूक शिवसेना ताकतीने लढणार आहे. याबाबतची जोरदार रणनीती आखरी आखणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे