खुनासह जबरी चोरीच्या गुन्ह्यात 15 वर्षापासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

अहमदनगर दि. 13 (सप्टेंबर) खुनासह जबरी चोरीच्या गुन्ह्यात 15 वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 16/12/2006 रोजी फिर्यादी बारीकनाथ नाना गोल्हार रा. जवळवाडी, ता. पाथर्डी यांचा मुलगा संतोष गोल्हार व त्यांची पत्नी उषाबाई गोल्हार मोटार सायकलवर रस्त्याने जाताना अनोळखी आरोपींनी जवळवाडी शिवारात रस्त्यात बाभळीचे झाडाला दोर आडवा लावुन मोटार सायकल आडवुन छातीत, डोक्यात धारदार हत्याराने मारुन जिवे ठार करुन 75,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 188/2006 भादविक 394, 302 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात दोन आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आली होती. गुन्ह्यातील आरोपी विष्णु पवळे हा सन 2008 साली जामिनावर सुटल्यापासुन फरार झाला होता.
मा. अतिरिक्त व सत्र न्यायालय क्रमांक 7, अहमदनगर यांचेकडील सेशन केस नंबर 241/2008, मधील आरोपी नामे विष्णु पांडुरंग पवळे रा. खरवंडी, ता. पाथर्डी हा फरार असल्याने मा. न्यायालयाने सीआरपीसी 82 प्रमाणे आरोपी फरार असले बाबत जाहिरनामा प्रसिध्द केला होता.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/विश्वास बेरड, चंद्रकांत माळी, पोना/रविंद्र कर्डीले व विशाल गवांदे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन मा. न्यायालयाने फरार जाहिर केलेल्या आरोपीचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने फरार आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) विष्णु पांडुरंग पवळे रा. खरवंडी, ता. पाथर्डी असे सांगितले. त्यास ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कार्यवाही पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, माश्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.