भोसे गावात श्री संत बाळूमामा भंडारा उत्सव संपन्न

भोसे दि.१३ सप्टेंबर (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत बाळूमामा यांचा भंडारा उत्सव श्रावणमास निम्मित भोसे येथे सोमवारी दि.11 सप्टेंबर रोजी भक्तीमय वातावरणात गुरूवर्य सद्गुरु श्री मनोहर मामांच्या कृपाआशीर्वादाने श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान भोसे- चखालेवाडीच्या वतीने साजरा करण्यात आला. भोसे येथे श्री संत बाळूमामा मेंढी माऊली समाधी मंदिर असून येथे दरवर्षी पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या आणि बाळूमामा प्रतिष्ठानच्या नियोजनातून भंडारा उत्सवा निम्मित विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी महराष्ट्रातील पारंपरिक गजे ढोल खेळाचे अयोजन करण्यात आले होते याप्रसंगी भक्तीमय वातावरणात श्री संत बाळूमामांच्या मूर्तीची विधीवत पूजा,अभिषेक करण्यात आला.यावेळी बाळूमामांच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. श्री संत बाळूमामांच्या मूर्तीची भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. तसेच जय मल्हार ग्रुपच्या वतीने गजे खेळाचे सादरीकरण करताना वाजत गाजत गावातील चौका-चौकामध्ये धनगरी ढोलांचा दणदणाट तसेच भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. मिरवणूक मार्ग पिवळाधमक झाला होता. तदनंतर आरती होऊन उत्सवाची सांगता महप्रसादाने करण्यात आली.
यावेळी भावडीचे सरपंचपती अर्जुन करनोर,तालुका दुध संघाचे संचालक दादासाहेब खराडे, माजी सरपंच राजेंद्र केशव ढोले, बाळूमामांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असणारे सामाजिक कार्यकर्ते आदमभाई शेख, बशीर शेख, ईस्मालभाई शेख, आकाश भाऊ गोसावी,संजय क्षिरसागर, उपसरपंचपती अमोल खटके, राहुल चखाले, अविनाश चव्हाण,चेअरमन सतीश खराडे, अर्जुन खराडे,गणेश खराडे,बाळासाहेब गाढवे,अमोल खराडे, सुहास क्षिरसागर, दादा गाढवे, विक्रम खराडे,दादा शिंगाडे,बाळासाहेब श्रीराम, उमेश क्षिरसागर, मयुर खराडे, गणेश श्रीराम, सुभाष गोसावी, शुभम महाराज शिंदे, प्रकाशनाना क्षिरसागर, ज्ञानेश्वर भोसले, दिलीप क्षिरसागर,सुधाकर चव्हाण, गोपीनाथ थोरात,अमोल बूरुंगे,बाळासाहेब क्षिरसागर, वैभव बूरुंगे, कृष्णा थोरात,तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी वैभव हराळ, रोहीत धालवडे, मोहन सांगळे, लालाभाऊ तापकीर,अभिषेक ढोले, युवराज ढोले, संतोष ढोले, शेवराव क्षिरसागर, साहिल ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.