शिर्डी येथे अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा तीन आरोपी ताब्यात, 45 गॅस टाक्यासह तब्बल सात लाखांचा मुद्देमाल जप्त

शिर्डी दि. १३ सप्टेंबर ( प्रतिनिधी) 12/09/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना हेलिपॅड रोड 11 नंबर चारी शिर्डी येथे चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे या बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. यावरून अमोल मोरे तहसीलदार राहाता यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय राहाता येथील पुरवठा निरीक्षक भारत खरात यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील कर्मचारी पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 35 घरगुती गॅस टाक्या तसेच 10 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत तसेच 1) संदीप पांडुरंग मते वय-39 रा. कातोरे वस्ती निमगाव तालुका राहाता.2) अनिस मोहम्मद सय्यद वय – ४८ रा. श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता.3) विवेक राजेंद्र आव्हाड रा. चांगदेवनगर निमगाव ता. राहाता या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 7,07,095 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI गुलाबराव पाटील, पुरवठा निरीक्षक भारत खरात,HC इरफान शेख,PN अशोक शिंदे,PC दिनेश कांबळे,HC आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.