दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनी दक्ष पोलिस मित्र सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकारीतेत उत्तम कामगिरी करणारे सर्वोत्कृष्ट विशेष पत्रकार पुरस्कार सोहळा संम्पन्न

अहमदनगर दि. 7 जानेवारी (प्रतिनिधी )
शनिवार दि . ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगरचे तहसीलदार श्री. संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत
कै.दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समिती, शेतकरी भवन, अ.नगर येथे संपन्न झाला .सामाजिक राजकिय सांस्कृतिक कार्यात पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पत्रकार दिना निमित्त पुरस्कार देऊन पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार संजय शिंदे, एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक, मोरेश्वर पेंदाम , कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, दिनकर मुंडे, कोतवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर यादव बार असोसिएशनचे उपअध्यक्ष ॲड . महेश शेडाळे आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी नानासाहेब चेडे (लोकमत) राष्ट्रप्रथम न्यूज चे सुर्यकांत बन्सी होनप, ग्रामीण पत्रकार संघ उपजिल्हा अध्यक्ष शिवहरी माणिक म्हस्के , जिल्हा सचिव संजय वायकर,युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाअध्यक्ष तथा देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे संपादक महेश भोसले, ऍक्टिव्ह मराठीचे संपादक तथा युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपअध्यक्ष उमेश साठे, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे शहर प्रतिनिधी तथा युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष अशोक तांबे,ऍक्टिव्ह मराठीचे जिल्हा प्रतिनिधी अरुण खिची,अनिकेत गवळी, प्रशांत शिंदे,
आसावरी वायकर, रफीक शेख( दै. प्रभात) , दुर्गेश राठोड , अन्सार शेख, , प्रविण देशमुख,
नितिन आढाव, जावेद शेख,गिरिष रासकर, विनोद साळवे, प्रशांत शिंदे,हेमंत साठे, सबिल सय्यद ,अनिकेत यादव , अविनाश निमसे (नगरी दवंडी)
ज्ञानदेव गोरे , दै. पुढारी
खासेराव साबळे लोकमत, दै . सकाळचे राजेंद्र पानकर , ,सौरभ गायकवाड आदि पत्रकार उपस्थित होते .