दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

अहमदनगर दि. २३ ऑगस्ट (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. संजय रावसाहेब घुले वय 52 रा. खरवंडी कासार, ता. नगर हे कुटूंबियासह घरात झोपलेले असताना अनोळखी 5 ते 6 आरोपींनी फिर्यादीचे घराचा दरवाजा कशाने तरी तोडुन, आत प्रवेश करुन, कुटूंबियांना मारहाण व जखमी करुन 80,100/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख चोरुन नेले होते. सदर घटने बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 726/2023 भादविक 395 प्रमाणे दरोडा चोरी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थागुशाचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे, सुनिल चव्हाण, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ/अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, जालिंदर माने, विजय धनेधर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना दिनांक 22/08/23 रोजी पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संशयीत आरोपी नामे शामुल काळे रा. आष्टी, जिल्हा बीड हा विना नंबर मोटार सायकलवर त्याचे साथीदारासह चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी वाकी रोडने, मिरजगांव येथे येणार आहे, आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने लागलीच मिरजगांव येथील वाकी जाणारे रोडवर सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे दोन इसम विनानंबर मोटार सायकलवर येताना पथकास दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्यांनी मोटार सायकल थांबविली. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) शामुल नवनाथ काळे वय 23, व 2) अमोल नवनाथ काळे वय 22, दोन्ही रा. वाकी, ता. आष्टी, जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले.
संशयीत आरोपींची पंचा समक्ष अंगझती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने मिळुन आले त्या बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार नामे संदीप ईश्वर भोसले, आटल्या ईश्वर भोसले, दोन्ही रा. बेलगांव, ता. कर्जत, होम्या उध्दव काळे रा. वाकी, ता. आष्टी, जिल्हा बीड व कृष्णा विलास भोसले रा. हातवळण, ता. आष्टी, जिल्हा बीड (सर्व फरार) अशांनी मिळुन पाथर्डी येथील घरात घुसून मारहाण करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना 2,39,000/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, एक ड्रिम निओ मोटार सायकल, 1 वन प्लस व 1 विवो कंपनीचा मोबाईल फोन अशा मुद्देमालासह ताब्यात घेवुन पाथडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे शामुल नवनाथ काळे हा सराईत गुनहेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण -08 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी -07 गुन्ह्यात फरार आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 337/21 भादविक 454, 380, 34 (फरार)
2. शिलेगांव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 225/21 भादविक 454, 380 (फरार)
3. शिऊर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 176/21 भादविक 454, 380 (फरार)
4. बिडकीन, जिल्हा छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 285/21 भादविक 394 (फरार)
5. देवगांव रंगारी , जिल्हा छ. संभाजीनगर गु.र.नं. 120/21 भादविक 454, 380 (फरार)
6. पाटस, जिल्हा पुणे ग्रामिण गु.र.नं. 2/22 भादविक 454, 380 (फरार)
7. श्रीगोंदा गु.र.नं. 130/22 भादविक 399, 402 (फरार)
8. श्रीगोंदा गु.र.नं. 363/23 भादविक 454, 380
आरोपी नामे अमोल नवनाथ काळे हा सराईत गुनहेगार असुन त्यांचे विरुध्द बीड जिल्ह्यात खुन व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे एकुण -02 गुन्हे दाखल आहे ते खालील प्रमाणे –
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. अंभोरा, जिल्हा बीड गु.र.नं. 76/22 भादविक 307, 324
2. आष्टी, जिल्हा बीड गु.र.नं. 79/22 भादविक 302, 34
आरोपीचे इतर फरार साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.