सामाजिक
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर दि.१८ ऑगस्ट (प्रतिनिधी)
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेते आयुष्यमान दिपक भाई केदार हे आज दि. 18 ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ठीक दोन वाजता पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या नवीन वास्तुप्रसंगी भेट देऊन शुभेच्छा देणार आहेत. व त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी वेळ देणार आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे आव्हान जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ थोरात यांनी केले आहे.