मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सामजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर करणार आमरण उपोषण

अहमदनगर दि. ५ (प्रतिनिधी)मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सामजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर करणार आमरण उपोषण करणार असल्याची माहिती भिंगारदिवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी महापुरुषा बदल अपशब्द बोलल्यामुळे तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात शिवप्रतिषठान या संघटनेवर संघटनेवर बंदी आणावी. तसेच भिडे यांचे जे राज्य दौरे चालू आहे ते रद्द करण्यात यावेत. त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, भिडे यांच्यावर राजद्रहोचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागण्यासाठी सोमवार दिनांक.7/8/2023 रोजी सकाळी 11 वाजल्या पासून जिल्हा पुलिस अधीक्षक कार्यालाय समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे.